1 राजे ८:१-४
१
तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.
२
इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.
३
जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,
४
आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवींनी ती वाहून आणली,
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.