1 राजे १५:२२-२५
२२
मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
२३
आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला.
२४
मग आसा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरला गेला. आणि त्याचा पुत्र यहोशाफाट राजा म्हणून त्याचा वारस झाला.
२५
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
Settings