Skip to content
1 राजे १३:२०-२३

1 राजे १३:२०-२३

२०
ते मेजावर जेवायला बसले असताना, याहवेहचे वचन त्या वृद्ध संदेष्ट्याकडे आले, ज्याने त्याला माघारी आणले होते.
२१
तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही.
२२
माघारी येऊन, ज्या ठिकाणी तू भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये असे याहवेहने तुला सांगितले होते, तिथे तू खाणेपिणे केले. म्हणून तुझ्या पूर्वजांच्या कबरेत तुझे शरीर पुरले जाणार नाही.’ ”
२३
परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.