Skip to content
1 राजे १२:१३-१६

1 राजे १२:१३-१६

१३
वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत राजाने लोकांना कठोरपणे उत्तर दिले,
१४
तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”
१५
अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.
१६
राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “आम्हाला दावीदामध्ये, इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options