मुख्य मजकुरावर जा
1 योहान ४:१-६

आत्म्यांची परीक्षा करा

1 योहान ४:१-६
प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.
याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे.
परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे.
प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत.
हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते.
आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options