Skip to content
1 योहान ३:१-३

देवाचे प्रेम आणि आपली भावी आशा

1 योहान ३:१-३
१
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
२
प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू.
३
ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options