Skip to content
1 करिंथकरांस ९:१२-१८

1 करिंथकरांस ९:१२-१८

१२
जर इतरांना तुमच्याकडून या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे, तर आम्हालाही तुमच्याकडून मिळण्याचा अधिक हक्क नाही काय? परंतु आम्ही त्या अधिकाराचा उपयोग केला नाही. याउलट, ख्रिस्ताच्या शुभवार्तेमध्ये अडखळण येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी सहन करण्यास तयार आहोत.
१३
जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?
१४
याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.
१५
परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.
१६
कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.
१७
मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.
१८
माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options