1 करिंथकरांस १२:२७-३०
२७
आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत,
२८
आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे.
२९
सर्व प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहेत काय? प्रत्येकाला चमत्कार करण्याचे दान मिळाले आहे काय?
३०
सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय?
Settings