Skip to content
1 करिंथकरांस १२:२१-२५

1 करिंथकरांस १२:२१-२५

२१
डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”
२२
उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत.
२३
आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
२४
सुरूप दिसणार्‍या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा.
२५
ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options