1 इतिहास ९:३-९
३
यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले:
४
ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.
५
शिलोनी वंश: त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र.
६
जेरही वंश: यऊवेल.
७
बिन्यामीन वंशातून: सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र;
८
इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;
९
वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते.
Settings