1 इतिहास ६:५४-६०
५४
हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):
५५
यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.
५६
पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.
५७
अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
५८
हीलेन, दबीर,
५९
आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
६०
बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह.
Settings