मुख्य मजकुरावर जा
1 इतिहास २९:२०-२५

उपासना, अर्पणे व शलमोनाचा अभिषेक

1 इतिहास २९:२०-२५
२०
नंतर दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुमच्या याहवेह परमेश्वराची स्तुती करा.” म्हणून त्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे याहवेह परमेश्वराची मस्तके लववून, दंडवते घालून, त्यांचा राजा याहवेहची स्तुती केली.
२१
दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.
२२
त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्‍यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.
२३
अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले.
२४
सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले.
२५
याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options