Skip to content
1 इतिहास २७:१६-२४

1 इतिहास २७:१६-२४

१६
इस्राएलांचे गोत्रप्रमुख हे होते: रऊबेन गोत्रावर: जिक्रीचा पुत्र एलिएजर; शिमओनी गोत्रावर: माकाहचा पुत्र शफात्याह;
१७
लेवी गोत्रावर: कमुवेलाचा पुत्र हशब्याह; अहरोन गोत्रावर: सादोक;
१८
यहूदाह गोत्रावर: दावीद राजाचा बंधू अलीहू; इस्साखार गोत्रावर: मिखाएलचा पुत्र ओमरी;
१९
जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;
२०
एफ्राईमच्या गोत्रावर: अजज्याहचा पुत्र होशेय; मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: पदायाहचा पुत्र योएल;
२१
गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्‍याहचा पुत्र इद्दो; बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल;
२२
दान गोत्रावर: यरोहामाचा पुत्र अजरएल.
२३
दावीदाने शिरगणती केली, तेव्हा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा त्या गणतीमध्ये समावेश केला नव्हता, कारण याहवेहने इस्राएली लोकांची संख्या आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करण्याचे वचन दिले होते.
२४
जेरुइयाहचा पुत्र योआबाने गणती सुरू केली, परंतु तो ती पूर्ण करू शकला नाही. कारण इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि गणतीची पूर्ण संख्या दावीद राजाच्या इतिहासात लिहिली गेली नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options