1 इतिहास २५:१-७
१
दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
२
आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.
३
यदूथून व त्याचे पुत्र: गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.
४
हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.
५
(हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)
६
हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.
७
ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.
Settings