1 इतिहास २०:५-८
५
पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
६
आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.
७
जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले.
८
हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.
Settings