Union बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे.
जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.