मुख्य मजकुरावर जा

Traffic बद्दल बायबलमधील वचने: Suspended on the Sabbath

8 वचने · 1 पैलू

Suspended on the Sabbath बद्दल वचने

  1. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  2. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.

  3. मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात?

  4. तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”

  5. यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

  6. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  7. पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही.

  8. नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.