Skip to content

The Euphrates बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला:

  2. “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.”

  3. मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला.

  4. बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.”

  5. मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता.

  6. तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  7. “याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे.