Skip to content

The Cedar बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात.

  2. मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा;

  3. गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्‍या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात.

  4. मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे.

  5. मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा.

  6. त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे,

  7. व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल.

  8. And he shall cleanse the house with the blood of the bird, and with the running water, and with the living bird, and with the cedar wood, and with the hyssop, and with the scarlet: