मुख्य मजकुरावर जा

Sacred Anointing बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड,

  2. पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन भरून जैतुनाचे तेल.

  3. यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.

  4. मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  5. त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  6. जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”