Physiology बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
तुम्ही मला त्वचा व मांस दिले, आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?
मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो.
गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.
तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.
शांत हृदय शरीर निरोगी ठेवते; परंतु ईर्षा हाडे कुजविते.