Passports बद्दल बायबलमधील वचने: Given to Nehemiah.
Given to Nehemiah. बद्दल वचने
पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा.
एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या.
मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते.