Skip to content

Miter बद्दल बायबलमधील वचने

10 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी.

  2. “शुद्ध सोन्याची एक पाटी तयार करावी आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तशी ही अक्षरे कोरावीत: याहवेहसाठी पवित्र.

  3. आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध.

  4. ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”

  5. “तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा.

  6. आणि रेशमी तागाचा फेटा व रेशमी तागाची टोपी आणि रेशमी तागाची अंतर्वस्त्रे केली.

  7. कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  8. त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र.

  9. ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  10. त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील.