Keturah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते.
तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.
योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते.
एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.