Skip to content

Jubilee बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जर शेत समर्पित करणार्‍याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल.

  2. तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही.

  3. जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल.

  4. “ ‘एखाद्याने स्वतःचे वतन नसलेले, पण दुसर्‍याकडून विकत घेतलेले शेत याहवेहला समर्पित केले, जी त्याच्या कुटुंबाची संपत्ती नसेल,

  5. तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे.

  6. योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे.