Skip to content

Iconoclasm बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही जाळून टाका; त्यांच्या सोन्यारुप्याच्या लोभ धरू नका आणि ते स्वतःकरिता घेऊ नका, नाहीतर तुम्ही त्याद्वारे सापळ्यात अडकाल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला याचा वीट आहे.

  2. नाशाचे कारण असलेली कोणतीही किळसवाणी वस्तू घरात आणू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल. ती घृणास्पद समजून तिचा अगदी वीट माना, कारण ती शापित आहे.

  3. याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने जो देश तुम्हाला ताब्यात घ्यावयास दिला आहे—तिथे तुम्ही या पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत हे विधी व नियम काळजीपूर्वकपणे पाळावेत.

  4. ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात तेथील उंच पर्वतांवर, टेकड्यांवरील आणि प्रत्येक घनदाट पसरलेल्या झाडाखाली जे त्या दैवतांची उपासना करतात ती सर्व ठिकाणे पूर्णपणे नष्ट करा.

  5. तुम्ही त्यांच्या वेद्या पाडून टाकाव्या, त्यांचे पवित्र दगड फोडून टाकावे, त्यांचे अशेरास्तंभ अग्नीत जाळून टाकावे, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्ती फोडून टाकाव्या आणि त्या ठिकाणातून त्यांची नावे पुसून टाकावी.

  6. याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना त्यांच्या पद्धतीने करू नका.