Horticulture बद्दल बायबलमधील वचने: Encouraged
Encouraged बद्दल वचने
“ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत,
चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे.
परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा?
परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता.