मुख्य मजकुरावर जा

Gourd बद्दल बायबलमधील वचने: Jonah's, believed to be a vine resembling the American squash, used in Assyria to cover booths

5 वचने · 2 पैलू

Jonah's, believed to be a vine resembling the American squash, used in Assyria to cover booths बद्दल वचने

  1. मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला.

  2. पण दुसर्‍या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले.

  3. जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.”

  4. तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.”

  5. परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली.