Skip to content

Fruits बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले.

  2. भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  3. याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.

  4. मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्‍या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.”

  5. मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील.