Skip to content

Edification बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो.

  2. जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. परंतु जो संदेश देतो, तो मंडळीची प्रगती करण्यास मदत करतो.

  3. तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्‍यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.

  4. हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.

  5. जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे.

  6. आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्‍हेतर्‍हेच्या शिक्षणरूपी वार्‍याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये.

  7. त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे.

  8. त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते.