Earthquakes बद्दल बायबलमधील वचने: As judgments
As judgments बद्दल वचने
म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने आणि त्यांच्या क्रोधाग्नीच्या दिवशी मी आकाशे थरथर कापतील असे करेन; पृथ्वी तिच्या जागेवर हादरेल.
शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे, जसे मेंढपाळ नसलेले मेंढरू, सर्व त्यांच्या त्यांच्या लोकांकडे परत जातील, ते त्यांच्या मातृभूमीत पळून जातील.
पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.
पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.