Skip to content

Cowardice बद्दल बायबलमधील वचने: General references

4 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. “ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.

  2. कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही.

  3. “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,

  4. तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, ज्यांनी आकाश ताणून पसरले आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तुम्ही सतत दहशतीखाली का जगता दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? विरोधकांचा क्रोध कुठे आहे?