Skip to content

Boil बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”

  2. तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली.

  3. ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला

  4. व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.

  5. याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे.

  6. पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.

  7. त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे.

  8. पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.

  9. मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले,

  10. तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.