मुख्य मजकुरावर जा

Assurance बद्दल बायबलमधील वचने: Comfort in affliction

6 वचने · 26 पैलू

Comfort in affliction बद्दल वचने

  1. आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही.

  2. छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही.

  3. आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे.

  4. यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत.

  5. आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही.

  6. म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.