Skip to content

स्तोत्रसंहिता७०

सुटकेसाठी तातडीची प्रार्थना

१
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका. हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.

विरोधकांविरुद्ध प्रार्थना

२
माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.
३
जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत.

देवाच्या लोकांचा आनंद

४
परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”
५
परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options