Skip to content

स्तोत्रसंहिता ६७

दैवी आशीर्वाद व प्रकाशासाठी प्रार्थना १–२

१
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला
२
यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे, तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे.

राष्ट्रांनी स्तुती करावी असे आवाहन ३–५

३
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
४
राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला
५
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.

देवाच्या आशीर्वादाचे फळ ६–७

६
कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे; परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात.
७
परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.