स्तोत्रसंहिता४७
Listen to this chapter
0:00
0:00
१
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.
२
कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.
३
त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले.
४
ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला
५
प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.
६
परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.
७
कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.
८
परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात; परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत.
९
जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note