स्तोत्रसंहिता१४९
Listen to this chapter
0:00
0:00
१
याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
२
हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.
३
त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.
४
कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.
५
या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.
६
त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,
७
राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे;
८
त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.
९
त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note