Skip to content

स्तोत्रसंहिता १२०

सुटकेसाठी आक्रोश १–२

१
प्रवाशांचे आराधना गीत. संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.
२
हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.

कपटींचे भवितव्य ३–४

३
अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
४
ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.

शत्रुत्वाच्या वातावरणातील परदेशवासाचा विलाप ५–७

५
धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!
६
जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.
७
मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.