सफन्याह २:१२
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १२ दाखवत आहे.
९
म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”
१०
त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.
११
जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.
१२
“अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”
१३
ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.
१४
कळप व मेंढरे सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे तिच्या स्तंभावर निवारा घेतील. घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.
१५
ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.
Settings