जखऱ्याह ८:९
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ९ दाखवत आहे.
६
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्यावेळी हे अवशिष्ट लोकांना अद्भुत वाटेल, परंतु मला ते अद्भुत वाटेल का?” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
७
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी माझ्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणेन.
८
त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.”
९
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “आता हे शब्द ऐका, ‘तुमचे बाहू बलवंत करा, जेणेकरून मंदिर बांधून पूर्ण होईल.’ जेव्हा सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा जे संदेष्टे तिथे हजर होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितले होते.
१०
त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते.
११
पण आधी मी वागलो तसे मी आता या अवशिष्ट लोकांशी वागणार नाही,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
१२
“ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन.
Settings