जखऱ्याह १:९-११
९
मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”
१०
मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.”
११
मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.”
Settings