Skip to content
गीतरत्न २:१०-१३

गीतरत्न २:१०-१३

१०
माझा प्रियतम मला म्हणाला, “माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.
११
पाहा! हिवाळा संपला आहे; आता पाऊससुद्धा होऊन गेला.
१२
पृथ्वीवर फुले उमलली आहेत; गाण्याचा ऋतू आला आहे, कबुतरांचे गीत आमच्या देशात ऐकू येत आहे.
१३
अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत; आणि द्राक्षवेलींच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. ऊठ, ये, माझ्या प्रिये; माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options