Skip to content
रूथ १:१-५

अलीमलेखाचे कुटुंब मवाबात स्थलांतर करते

रूथ १:१-५
त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला.
त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब देशात गेले आणि तिथेच राहिले.
आता नाओमीचा पती एलीमेलेख मरण पावला आणि ती तिच्या दोन पुत्रांसह एकटी राहिली.
त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर,
महलोन आणि किलिओन हे दोघेही मरण पावले आणि आता नाओमी तिचे दोन पुत्र आणि तिचा पती यांच्याशिवाय राहू लागली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options