Skip to content
रोमकरांस १४:४-१२

रोमकरांस १४:४-१२

दुसर्‍याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
कोणी मनुष्य एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो; आणखी कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाने पूर्ण खात्री करून घ्यावी.
जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो.
कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही.
आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत.
ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
१०
तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे.
११
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”
१२
तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options