प्रकटीकरण २:२-३
२
तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.
३
माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे.