Skip to content
प्रकटीकरण १४:१७-२०

प्रकटीकरण १४:१७-२०

१७
यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.
१८
दुसरा एक देवदूत ज्याला अग्नीवर अधिकार होता तो वेदीतून बाहेर आला आणि विळा घेतलेल्या देवदूताला मोठ्याने म्हणाला, “पृथ्वीवरील द्राक्षवेलींना लागलेले द्राक्षांचे घोस, विळा चालवून कापून घे. कारण ते पिकले आहेत.”
१९
तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर आपला विळा चालविला आणि द्राक्षे गोळा करून, रस काढण्यासाठी ती परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकली.
२०
ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options