Skip to content
स्तोत्रसंहिता ९९:६-९

प्रार्थना व उत्तराची ऐतिहासिक उदाहरणे

स्तोत्रसंहिता ९९:६-९
मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.
ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.
याहवेह, आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांना उत्तर दिले; त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली, तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.
आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options