Skip to content
स्तोत्रसंहिता ९५:७-११

हृदय कठीण करण्याविरुद्ध इशारा

स्तोत्रसंहिता ९५:७-११
कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!
“मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.
माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
१०
चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’
११
मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options