Skip to content
स्तोत्रसंहिता ८९:७-११

स्तोत्रसंहिता ८९:७-११

७
सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.
८
हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का? विश्वासूपणाचे वलय तुमच्याभोवती आहे.
९
भयानक उसळणार्‍या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.
१०
तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव; तुमच्या शक्तिशाली बाहूने तुम्ही शत्रूंची दाणादाण केली.
११
स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे; कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options